
Gautami Patil on Vaishnavi Hagawane: हुंडाबळी वैष्णवी हगवणे प्रकरणानं सध्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. हगवणे कुटुंबियांविरोधात लोकांमध्ये सध्या प्रचंड संतापाचं वातावरण आहे. त्यातच या हगवणे कुटुंबियांनी आपल्या घरच्या बैलासमोर गौतमी पाटील हिचा डान्सचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावरुन मोठी टीका-टिप्पणी व्हायला लागली होती. याच प्रकरणावर आता गौतमी पाटील हीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी तिनं वैष्णवीच्या कुटुंबियांना पाठिंबा असल्याचंही म्हटलं आहे.