
avinash dharmadhikari
esakal
माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांना नुकत्याच पनवेल-नांदेड एक्स्प्रेसच्या प्रवासादरम्यान एक धक्कादायक अनुभव आला. त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे याबाबत माहिती देताना रेल्वेतील एका गंभीर प्रकाराकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, पनवेल-नांदेड एक्स्प्रेसच्या एसी 2 टियर डब्यातील शौचालयाच्या भिंतीवर "गजवा-ए-हिंद २०४७" असे लिहिलेले आढळले. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितले.