
GBS Cases Updates: राज्यात जीबी सिंड्रोमचा धोका वाढला आहे. पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या 130 वर स्थिर असली तर या आजारामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला असून पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ वर्षीय तरुणाचा तर पुण्यातील नांदेड गावातील एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या आजाराने राज्यात आतापर्यंत ४ जणांचा बळी घेतले आहेत. यातील तीन पुण्यातील आहे. त्यामुळे जीबीएस आजाराची भीती वाढली आहे. पालिका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.