Chandgad Wildlife: चंदगडच्या जमिनीत नव्या सिसिलियन प्रजातीचा शोध; ‘गेगेनओफिस चंदगडी’ नावाने स्थानिक बोलीला मानाचा मुजरा

पश्चिम घाटातील जमिनीखाली दडलेल्या जैवविविधतेत चंदगड परिसरात सापडलेल्या नव्या पायविरहित उभयचर प्रजातीला स्थानिक चंदगडी बोलीचा सन्मान राखत ‘गेगेनओफिस चंदगडी’ हे शास्त्रीय नाव
New caecilian species named after Chandgadi dialect

New caecilian species named after Chandgadi dialect

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास करताना संशोधकांना आणखी एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरात जमिनीखाली राहणाऱ्या आणि पाय नसलेल्या उभयचर (सीसिलियन) प्राण्याची एक नवी प्रजाती संशोधकांनी शोधून काढली आहे. ‘गेगेनओफिस चंदगडी’ असे तिचे शास्त्रीय नामकरण करण्यात आले असून, चंदगड परिसरात बोलल्या जाणाऱ्या चंदगडी मराठी बोलीभाषेचा व स्थानिक संस्कृतीचा सन्मान म्हणून हे नाव देण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com