

पुणे, ता. ११ ः ‘जेन झी आणि जेन अल्फा’ यांना आता महाराष्ट्रभर दर्जेदार चित्रपट दाखविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज (पश्चिम विभाग)च्या कार्यकारिणीत घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनापासून (ता. १५) या अभियानास सुरुवात करण्यात येईल.
पुढील महिन्यात कलकत्ता येथे होणाऱ्या अखिल भारतीय बैठकीत हा मुद्दा आग्रहाने मांडला जाईल, अशी माहिती फेडरेशनचे उपाध्यक्ष वीरेंद्र चित्राव यांनी दिली. या निमित्ताने १०० कॅम्पस फिल्म सोसायटीज स्थापन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत कॉलेज व्यवस्थापन व प्राचार्य यांच्या परवानगीने कॅम्पस फिल्म क्लब स्थापन करण्यात येईल. सर्व विद्यापीठे यात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जातील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने फिल्म क्लब स्थापन करण्यास मान्यता दिली असून, लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. महाराष्ट्र आणि गोवा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात पाच फिल्म क्लब करण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती चित्राव यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.