‘सामान्य प्रशासन विभागामुळे प्राध्यापकांची भरती रखडली’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सामान्य प्रशासन विभागातर्फे छोट्या संवर्गातील बिंदू नियमावलीसंदर्भात निर्णय होत नाही. त्यामुळे विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती रखडली आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

पुणे - सामान्य प्रशासन विभागातर्फे छोट्या संवर्गातील बिंदू नियमावलीसंदर्भात निर्णय होत नाही. त्यामुळे विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती रखडली आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सामंत यांनी ११ जानेवारीला पुण्यात एका महिन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक भरतीची जाहिरात काढली जाईल, असे सांगितले होते. त्यावर बुधवारी ‘सकाळ’ने वृत्त प्रकशित करून भरतीची प्रक्रियाच झाली नसल्याचे समोर आणले. त्यावर बुधवारी उदय सामंत यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरतीला आम्ही ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे; पण विद्यापीठातील भरती थांबलेली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बिंदू नियमावलीची फाइल विधी विभागाकडे पाठविली आहे. त्यांच्या प्रधान सचिवांशी मी अनेकदा चर्चा केली. त्यांच्याकडून लवकरच आदेश मिळेल. या विभागाकडून आम्हाला आदेश मिळाली की, एका महिन्यात भरती प्रक्रिया सुरू करू.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The General Administration Department hired the faculty