पुणे - ‘पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची पावसामुळे गैरसोय टाळण्यासाठी यंदा पहिल्यांदाच जर्मन हॅंगर (मंडप) उभा करण्यात येणार आहेत. पालखीमार्गावर १२ ठिकाणी हे मंडप असतील. यासह स्वच्छता, तात्पुरते स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा, हिरकणी कक्षाची व्यवस्था केली आहे. विशेषतः वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी बुधवारी दिली.