esakal | लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो पाहून जर्मनीतील अधिकारी संतापली
sakal

बोलून बातमी शोधा

लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो पाहून जर्मनीतील अधिकारी संतापली

लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो पाहून जर्मनीतील अधिकारी संतापली

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : मोदींचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावर हवा की नाही यावरुन वाद सुरु असताना परदेशातील विमानतळावर हा फोटोमुळे गोंधळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील अ‍ॅड. असिम सरोदे यांच्या मैत्रिण दीप्ती ताम्हणे सोबत घडलेला हा प्रकार त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे.

तर घडले असे की, लंडनला निघालेल्या दीप्ती ताम्हणे यांना फ्रँकफर्ट (जर्मनीची आर्थिक राजधानी) विमानतळावर लसीकरणाच्या प्रमाणपत्राची मागणी केली होती, त्यावेळी घडलेला प्रकार सरोदे यांनी फेसुबक पोस्टदवारे शेअर केला आहे.

''दिप्ती यांनी लसीकरणाच्या प्रमाणपत्र दाखविल्या नंतर तेथील महिला अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्यांचे प्रमाणपत्र दाखवत आहा असे सांगितले. त्यावर दिप्ती यांनी सांगितले ते प्रमाणपत्र त्यांचे असून त्यावर असलेला फोटो आमच्या पंतप्रधानांचा आहे. हे ऐकताच तेथील सर्व स्टाफ खळखळून हसला.'' हा किस्सा असिम यांनी सांगितला आहे. तसेच “असे ओशाळवाने अनुभव किती जणांना आले असतील. भारतीय लोकांची शोभा करणारा व खजील करणारा अनुभव दीप्ती ताम्हणे हिने लिहिला आहे, तो जरूर वाचावा,” असेही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे.

दीप्ती ताम्हणे यांच्या पोस्टमध्ये नक्की काय लिहले आहे?

दीप्ती ताम्हणे यांनी फ्रँकफर्ट विमानतळावर घडलेला किस्सा फेसबुर पोस्ट करुन शेअर केला आहे. “लंडनला जाण्यासाठी फ्रँकफर्ट विमानतळावरील लुफ्तान्साच्या सर्व्हिस डेस्कवर आम्ही पोहचलो. तेथील कर्मचाऱ्यांनी लसीकरण प्रमाणपत्रासह वेगवेगळी कागदपत्रं मागितली. डेस्कवरील महिलेला ते लसीकरणाचं प्रमाणपत्र दिलं. ती महिलेने प्रमाणपत्रावरील तारीख आणि फोटो पाहून संतपाली आणि म्हणाली, हा तुमचा फोटो नाही. हे चुकीचं प्रमाणपत्र तुम्ही मला दिलं आहे.'' खोटं प्रमाणपत्र देऊन फसवणूक करत असल्याचा त्यांचा समज झाला असावा त्यावर दिप्ती यांनी सांगितले, तुम्ही जे सांगत आहात ते योग्य आहे हा फोटो माझा नाही, आमच्या माननीय पंतप्रधानांचा आहे.'' हे ऐकताच ती महिला मोठमोठ्याने हसू लागली आणि तिने ते प्रमाणपत्र तिच्या सहकाऱ्यांना दाखवल्यानंतर तेही हसू लागले. '' यापूर्वी त्यांनी असं काहीच पाहिलेलं नाही असेही तेथील कर्मचाऱ्यांनी सांगत त्यांनी आमची प्रमाणपत्र स्वीकारली.”

loading image