esakal | कोरोनाचे विघ्न लवकरच दूर कर, हर्षवर्धन पाटलाचे गणरायाला साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे विघ्न लवकरच दूर कर, हर्षवर्धन पाटलाचे गणरायाला साकडे

कोरोनाचे विघ्न लवकरच दूर कर, हर्षवर्धन पाटलाचे गणरायाला साकडे

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात तसेच राज्यात कोरोनाची तिसरी लाट येवू नये, व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा. असे साकडे घालत राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील आपल्या भाग्यश्री निवास स्थानी विघ्नहर्ता श्री गणेशाची भक्तीमय वातावरणात सहकुटुंब प्रतिष्ठापना केली.

हेही वाचा: इंदापूर : महिलांसाठी जाणीव जागृती शिबिराचे आयोजन.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नीतथा इंदापूर जिजाऊ महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषद सदस्या तथा कन्या अंकिता पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा मुलगा राजवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यात कोरोनाची दुसरी लाट संपत असून, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.

सदर लाट येऊ नये तसेच कोरोना महामारीचे संकट दूरहोवून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, राज्यातील सर्व नागरिक व शेतकरी यांचे जीवन सुखी व समाधानी व्हावे, सर्वांना आनंदाने जीवन जगता यावे असे साकडे त्यांनी गणराया चरणी घालून सर्वांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

loading image
go to top