esakal | इंदापूर : महिलांसाठी जाणीव जागृती शिबिराचे आयोजन.
sakal

बोलून बातमी शोधा

indapur

इंदापूर : महिलांसाठी जाणीव जागृती शिबिराचे आयोजन.

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : सरडेवाडी ( ता. इंदापूर ) ग्रामपंचायतीच्या वतीने आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक जयंतीचे औचित्य साधून पोषण महाअभियानांतर्गत महिलांसाठी आयोजित जाणीव जागृती शिबिराचा लाभ शेकडो महिलांनी घेतला.

यावेळी नरवीर उमाजीराजे नाईक व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचेपूजन इंदापूर पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी संदीप काळे व सरपंच सिताराम जानकर यांच्या हस्ते झाले.यावेळी महिलांना शिबिरांतर्गत "मासिक पाळी - शाप की वरदान" या विषयावर डॉ. दिपक खाडे यांनी व्याख्यान दिले तर संदिप काळे यांनी पोषण अभियानांतर्गत महिला आणिबालकांचे पोषण याविषयी सविस्तर माहिती दिली.

हेही वाचा: इंग्लंडची चिटींग; रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी?

यावेळी सरपंच सिताराम जानकर म्हणाले, नरवीर उमाजी नाईक हे स्वातंत्र्याचे आद्य क्रांतीवीर होते. युवती व महिलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व पोषणविषयक जागृती निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

यावेळी उपसरपंच हनुमंत जमदाडे, सतीश चित्राव, रविंद्र सरडे, गोकुळ कोकरे, प्रियंका शिद, वैशाली शिद, वैशाली कोळेकर, सुप्रिया कोळेकर, गयाबाई तोबरे, अलका कडाळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका राणीजाधव,अंगणवाडी सेविका दक्षता ढावरे,अलका ढावरे, प्रियंका शिंदे, छाया कदम, गंगूबाई सिताप, वडापुरी बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या. प्रास्तविक व सूत्रसंचालन ग्रामसेविका स्वाती चव्हाण तर आभारप्रदर्शन अलका जगताप यांनी मानले. कार्यक्रमासाठी अथर्व लाॅन्स मोफत उपलब्ध करून देणारे सरडेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत सरडे यांचा सत्कार झाला.

loading image
go to top