तोलणारांना तातडीने कामावर रूजू करून घ्या अन्यथा.... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

प्रशासक गरड यांचे व्यापार्‍यांना आदेश

मार्केट यार्ड (पुणे) : गूळ भुसार विभागातील तोलणारांना व्यापाऱ्यांनी तातडीने कामावर रूजू करून घ्यावे अन्यथा कारवाई केली जाईल. असे आदेश बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिले आहेत. यापूर्वीही कामावर रूजू करून घेण्याचे आदेश बाजार समितीने दिले होते. मात्र आदेश देऊनही व्यापार्‍यांनी तोलणारांना कामावर रूजू करून घेतलेले नाही. त्याबाबच्या तक्रारी कामगारांनी बाजार समितीकडे केल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा परिपत्रक काढून हे आदेश दिले आहेत.
  

पुण्यात ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत ठेवा : अजित पवार

गूळ-भुसार विभागात शेतीमाल खूपच कमी येतो. बाजारात सर्वात जास्त कंपनीचा माल येतो. तसेच सर्वत्र इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर मालाचे वजन होते. त्यामुळे या कामासाठी तोलाई देण्याची गरज नाही. अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतली होती. तसेच तोलाई न भरण्याबाबत उच्च न्यायालयात अर्जही दाखल केला आहे. मात्र न्यायालयाने पॅकींग मालासाठी तोलाईचा आग्रह धरू नका अशी सुचना केली आहे. मात्र कामगारांना कामावर रूजू न करून घेण्याबाबत कोणतेच भाष्य केलेले नाही. त्यामुळे पूर्वीच्या आदेशाप्रमाणे तोलणारांना कामावर रूजू करून घ्यावे. त्यांना मालाची वजन करू द्यावे. असे परीपत्रकात म्हटले आहे.
  

लहान मुलांची भांडणं सोडवणं तरुणाला पडलं महागात; तिघांनी केले कोयत्याने वार​

बाजार समिती कायद्यातही बाजारात येणार्‍या मालाचे वजन तोलणारांनी करण्याची तरतुद आहे. न्यायालयानेही कामगारांच्या कामाबाबत कोणतेच आदेश दिले नाहीत. त्यामुळे त्यांना कामावर रूजू न करून घेणे. तसेच त्यांना मालाचे वजन न करू देणे हा न्यायालयाचा अवमान आहे. तसेच बाजार समितीने 10 जुलै 2020 व 24 सप्टेंबर 2020 रोजी कामगारांना कामावर रूजू करून घेण्यासाठीचे पत्र पाठवूनही कामगारांना कामावर रूजू करून घेतले नाही. ही बाब न्यायालय व बाजार समितीच्या आदेशाचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे तात्काळ व्यापार्‍यांनी कामगारांना रूजू करून घ्यावे, त्यांना मालाचे वजन करू द्यावे. थकीत तोलाई महामंडळाकडे जमा करावी असे आदेश प्रशासक गरड यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास व्यापार्‍यांवर कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

पॅकींग मालाला आम्ही तोलाई देणार नाही. शेतीमाल आणि खुल्या मालाला तोलाई देण्यास आम्ही तयार आहोत. बाजारात ज्या ठिकाणी खुला शेतीमाल येतो त्याठिकाणी तोलणारांना रूजू व्हावे. अन्य ठिकाणी तोलणारांनी जाण्याची गरज नाही. कामगारांबाबत आम्ही न्यायालयात अर्ज केला आहे. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने तोलणारांना कामावर रूजू करून घेतले नाही. कामगाराबाबत 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर कामगारांना रूजू करून घ्यायचे किंवा नाही हे स्पष्ट होणार आहे.
- पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पूना मर्चंटस् चेंबर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Get the weighbridge back to work immediately or else action will be taken