पूजेचे तूप मोटरमनच्या ताटात!

पूजेचे तूप मोटरमनच्या ताटात!
Published on

पूजेसाठी वापरले जाणारे तूप
मोटरमनच्या खाद्यपदार्थात‘
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : सीएसएमटी येथील मोटरमन लॉबीतील कॅन्टीनमध्ये दररोज सुमारे ५०० मोटरमन आणि गार्ड नाश्ता-जेवण करतात. या कर्मचाऱ्यांसाठी तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांत मानवी सेवनासाठी नाही असे नमूद असलेले तूप वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार मध्य रेल्वेच्या तपासणीत उघडकीस आले. देवपूजा, दिवे आणि हवनासाठी वापरण्याच्या सूचना असलेले हे उत्पादन खाद्यपदार्थांत वापरल्याचे आढळल्यानंतर रेल्वेने संबंधित ‘साई कॅटरर्स’चे कॅन्टीन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांनी सीएसएमटी मोटरमन लॉबीतील कॅन्टीनची तपासणी केली असता खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये मानवी सेवनासाठी नसलेले हे उत्पादन आढळले. तपासणीतील निष्कर्षांचा अहवाल वरिष्ठ विभागीय परिचलन व्यवस्थापकांकडे पाठविण्यात आला. त्यानंतर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित कॅन्टीन तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. उत्पादनाच्या लेबलनुसार त्यात गायीचे तूप, वनस्पती तेल, वनस्पती, रंग आणि स्वादवर्धक असल्याचे नमूद आहे. हे उत्पादन मानवी सेवनासाठी नसल्याचेही त्यावर स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com