

Shirur Water Crisis Ghod River Dries Up and Six Check Dams Remain Empty Villagers Demand Urgent Water Release From Dam
sakal
मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव आणि तांदळी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोड नदीचे पात्र कोरडे पडले आहे. नदीवरील सहाही बंधारे रिकामे आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरू आहे. त्यामुळे घोड धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थांकडून होत आहे.