

Three-Day Bullock Cart Race Marks Datta Jayanti at Ghodegaon
Sakal
घोडेगाव : घोडेगाव (ता आंबेगाव) येथे दत्तजयंती निमित्त सलग तीन दिवस बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील सर्वात मोठी यात्रा घोडेगाव येथे भरते. 24 गाडे फायनल बक्षिसास पात्र ठरले. सर्व गाडे मालकांना संधी मिळावी म्हणून तिन दिवस गाड्याची यात्रा भरविली होती. गाडे मालकांचे ५०० रुपये डिपॉझीटच्या पैशाची कपात नकरता सर्व पैसे परत केले. तिन दिवसात एकूण ५६५ गाडे धावले. अतिशय उत्तम नियोजन व शिस्त कार्यकत्यांच्या योगदानातुन लाभली.