

Ghodegaon Police Arrest Suspects in Nighttime Burglary
Sakial
घोडेगाव : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत १९ नोव्हेंबर रोजी कोंबिंग ऑपरेशन व रात्रगस्त दरम्यान निर्मनुष्य ठिकाणी तीन संशयित इसम एका विनानंबर प्लेट मोटर सायकलसह आढळून आले होते. त्यावेळी त्यांना पोलीसांची चाहुल लागताच पळताना एक जण ताब्यात मिळाला व दोघे अंधारामध्ये पळून गेले होते. त्यावेळी ताब्यातील सुनील उर्फ पोटया विलास मधे (रा. जवळा ता. पारनेर जि. अहिल्यानगर) याचेकडे प्राथमिक चौकशी केली असता तसेच त्याचेकडे मिळुन आलेल्या गाडीची पडताळणी केली असता त्याने घरफोडी करण्यासाठी आलो असल्याची कबूल दिली.