

Tribal students nutrition program launched, biofortified grains initiative introduced at Ghodegaon
Sakal
घोडेगाव (ता आंबेगाव ) : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि न्युट्रिशिअस अॅग्रो फ्यूचर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी आदिवासी आश्रमशाळेतील मुलांकरीता अन्न सुरक्षा, पोषण आणि आरोग्य यावर एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला आहे. हा करार आदिवासी विद्यार्थ्यांना योग्य पोषण मिळावे.आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी.यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी सांगितले.