

Need for a Taluka Mini Veterinary Hospital
Sakal
घोडेगाव : घोडेगाव (ता आंबेगाव) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातर्फे घोडेगाव, धोंडमळा शिंदेवाडी, कोलदरे, गोनवडी, काळेवाडी, दरेकरवाडी, आंबेगाव गावठाण, कोळवाडी, कोटदरमळा इत्यादी गावांमध्ये सेवा दिली जाते. सदर गावांमिळून अंदाजे 2500 पशुधन असून यामध्ये गोवर्ग, म्हैसवर्ग तसेच शेळी व मेंढ्यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर उच्च श्रेणीचा दवाखाना येथे सुरू करावा अशी मागणी आहे. यासाठी जागा नसल्यामुळे हा प्रस्ताव अजूनही पुढे सरकलेला नाही.पशुसंवर्धन विभागाच्या पुनर्रचनेमुळे आता येथे तालुका लघु पशु सर्वचिकित्सालय प्रस्तावित आहे.