Flood Alert: भीमाशंकर-आहुपे पट्ट्यात मुसळधार पावसाने घोडनदी तुफानी; शिरूर शहरातील कोल्हापूर पद्धतीचे २७ बंधारे ओव्हरफ्लो

आहुपे व भीमाशंकर पट्ट्यात मुसळधार पावसामुळे घोडनदीला अचानक पूर; कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओव्हरफ्लो, घाट-पूल परिसर जलमय, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Authorities have advised residents living along the riverbank to remain alert as water levels continue to rise due to upstream rainfall.

Authorities have advised residents living along the riverbank to remain alert as water levels continue to rise due to upstream rainfall.

Sakal

Updated on

शिरूर : भीमाशंकर खोऱ्यात व प्रामुख्याने घोडनदीचा उगम मानल्या गेलेल्या आहुपे खोऱ्यात गेल्या २४ तासात मुसळधार पाऊस चालू असल्याने घोडनदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली असून, नदीकिनारच्या नागरीकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान घोडनदी दूथडी भरून वाहात असल्याने शहराला पाणीपुरवठा करणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला. सतरा कमानी पूलाजवळ तसेच शहरातील गणपती विसर्जन घाट व शनिमंदिराजवळ घोडनदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com