घोरपडीकरांना रेल्वे फाटकमुक्त प्रवासाची प्रतीक्षा...

घोरपडीकरांना रेल्वे फाटकमुक्त प्रवासाची प्रतीक्षा...
Published on

घोरपडी, ता. २२ : येथील मिरज रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. या प्रकल्पाची मुदत संपून सहा महिने उलटले तरी काम पूर्ण न झाल्याने या भागात दररोज सकाळ आणि सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होते.
या पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत २०२५ अखेर निश्‍चित केली होती. मात्र, सध्या कामाचा वेग अतिशय संथ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र ‘फाटकमुक्त’ करण्याची घोषणा केली असली, तरी घोरपडीतील सद्यःस्थिती पाहता हा परिसर फाटकमुक्त कधी होणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रेल्वे फाटकामुळे हडपसर, घोरपडी, मुंढवा, कॅम्प आणि पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांचे इंधन आणि वेळ वाया जात आहे. येथील कोंडीत रुग्णवाहिका आणि शालेय बसही अडकून पडतात. त्यामुळे या पुलाचे काम तातडीने पूर्ण झाल्यास या भागातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mumbai Sion and Vidyavihar flyovers will opened
Kolhapur Ring Road development project
Jalgaon railway flyover latest update
The Maharashtra government inaugurated nine infrastructure projects worth Rs 484 crore, including a four-lane railway overbridge in Nagpur.
Marathi News Esakal
www.esakal.com