Raghunath Kuchik case | रघुनाथ कुचिकच्या राज्यमंत्री दर्जाच्या पदाचा अद्याप राजीनामा का नाही - चित्रा वाघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

रघुनाथ कुचिकच्या राज्यमंत्री दर्जाच्या पदाचा अद्याप राजीनामा का नाही - चित्रा वाघ

पुणे : "पिडीत तरुणी व तिला मदत करणाऱ्या आम्हालाच दोषी ठरविण्याचा प्रकार सुरु आहे. सरकारच रघुनाथ कुचिकच्या मुलीला पुढे करून आमच्या नार्को चाचण्या करण्याची मागणी करत आहे. अजूनही कुचिकचा राज्यमंत्री दर्जाच्या पदाचा अजूनही राजीनामा घेतलेला नाही. याऊलट कुचिकचा साथीदार राहुल बोहरा हा सरकारी वकीलास "लल्लु', "जज हमारा है' असे मेसेज पिडीतेला पाठवून न्यायव्यवस्थेबाबत चुकीची भाषा वापरीत आहे. त्यामुळेच आता या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,'' अशी टिका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी केली. तर "आमची नार्को चाचणी जरुर करा, पण आगोदर कायद्याचा अभ्यास करा' अशा शब्दात नार्को चाचणीची मागणी करणाऱ्यांना सुनावले.

मागील आठवड्यानंतर सलग दुसऱ्यांता वाघ यांनी कुचिक प्रकरणासंबंधी पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर टिका केली. वाघ म्हणाल्या, ""पिडीत तरुणी आगोदर पोलिस, सर्व राजकीय पक्ष, त्यांचे देशपातळीवरील नेते यांच्यापासून ते सत्ताधारी पक्षाकडेही न्यायासाठी गेली. परंतु तिची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे ती मुलगी माझ्याकडे, भाजपकडे आली. तिला न्याय देणे दूर, याऊलट तिच्यासह तिला मदत केली म्हणून आम्हाला दोषी ठरविले जात आहे. मुलगी खोटे बोलत असेल, तर आगोदर तिची सत्यता तरी तपासून घ्या'' दरम्यान, वाघ यांनी कुचिक प्रकरणातील गुन्ह्यात नोंद असलेल्या राहुल बोहरा याने पिडीत तरुणीला पाठविलेले मेसेज वाचून दाखवित त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

"त्या' प्रकरणाचा वाघ यांच्याकडून केवळ उल्लेखच !

वडगाव शेरी येथे शाळेतच मुलीवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणातील जखमी मुलीचे उपचाराचा खर्च सरकारने करावा. आत्तापर्यंत मुलीच्या वडीलांनी ऊसनवारी करून 70 हजार रुपये रुग्णालयात भरले आहेत. त्यांना ती रक्कम सरकारने द्यावी, अशी मागणी वाघ यांनी केली. तर शिवाजीनगर येथील नामांकीत शाळेच्या स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाचा मात्र वाघ यांनी ओझरता उल्लेख करीत त्यावर बोलण्याचे टाळले.

Web Title: Ghunath Kuchik Has Not Resigned From Post Minister Of State Chitra Wagh Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..