नारायणगावात २२ तपासण्या होणार अवघ्या काही वेळात 

रवींद्र पाटे
Saturday, 19 September 2020

ग्रामीण रुग्णालयाला जगदंब प्रतिष्ठान व बंधन बँक लिमिटेड यांच्या वतीने मल्टिपर्पज पॅरा मीटर टेस्टिंग (ईड्युटेंनमेंट) यंत्रणा भेट देण्यात आली. त्यामुळे कोरोनाबाधित व इतर रुग्णांच्या बावीस तपासण्या एकाचवेळी काही मिनिटात घेता येणे शक्य झाले आहे. त्यातून वेळेची बचत होऊन रुग्णांची चिकित्सा अचूक होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश आगम यांनी दिली. 

नारायणगाव (पुणे) : येथील ग्रामीण रुग्णालयाला जगदंब प्रतिष्ठान व बंधन बँक लिमिटेड यांच्या वतीने मल्टिपर्पज पॅरा मीटर टेस्टिंग (ईड्युटेंनमेंट) यंत्रणा भेट देण्यात आली. त्यामुळे कोरोनाबाधित व इतर रुग्णांच्या बावीस तपासण्या एकाचवेळी काही मिनिटात घेता येणे शक्य झाले आहे. त्यातून वेळेची बचत होऊन रुग्णांची चिकित्सा अचूक होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश आगम यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (ता. १८) जगदंब प्रतिष्ठानचे सागर रामसिंग कोल्हे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या हस्ते ही यंत्रणा ग्रामीण रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आली. या वेळी तहसीलदार हणमंत कोळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश गोडे, दिलीप कोल्हे, आदित्य मराठे, गणेश वाजगे, मुकेश वाजगे, संतोष केदारी, राहुल गावडे, तुषार डोके, अतुल आहेर, आशिष हांडे आदी उपस्थित होते. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे. ऑक्सिजनची गरज असणाऱ्या वीस रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था या कोविड उपचार केंद्रात केली आहे. तालुक्यात रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. अत्यावश्यक तपासण्या तातडीने झाल्यास डॉक्टरांना कोरोनाबाधित व इतर रुग्णांवर तातडीने उपचार करण्यास मदत होईल, या उद्देशाने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सुमारे साडेसात लाख रुपये किमतीची ईड्युटेंनमेंट व हायफ्लो नोझल सेटअप यंत्रणा भेट देण्याची सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gift to Eduatement System Narayangaon Hospital