सौ. जयश्रीताई गिरींसह कुडाळ गटातील सर्व उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील : मच्छिंद्र मुळीक

सौ. जयश्रीताई गिरींसह कुडाळ गटातील सर्व उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होतील : मच्छिंद्र मुळीक

Published on

गिरी कुटुंबीयांचे जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध

मच्छिंद्र मुळीक; कुडाळ गटातील भाजप उमेदवारांची कोपरा सभा

आनेवाडी, ता. ४ : जावळी तालुक्यातील गावागावांमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून भरीव विकासकामे पोहोचली आहेत. यासोबतच जयश्री गिरी व सुहास गिरी यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे व विश्वासाचे संबंध जपले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदार भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहून जिल्ह्यात विक्रमी मताधिक्याने विजयी करतील, असा ठाम विश्वास जावळी बाजार समितीचे संचालक मच्छिंद्र मुळीक यांनी व्यक्त केला.

कुडाळ जिल्हा परिषद गटातील भाजपच्या उमेदवार हभप जयश्री गिरी, सायगाव गणातील उमेदवार चारुशीला पवार यांच्या प्रचारार्थ खर्शी तर्फ कुडाळ येथे झालेल्या मतदार भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुहास गिरी, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अंकुशराव शिवणकर, सरपंच दुर्गा भिसे, राजेंद्र फरांदे, अशोक भोसले, जगन्नाथ शिवणकर, डॉ. अतुल भोसले, आचलदास सोनवणे, नामदेव भिसे, अश्विनी मुळीक, भीमा शिवणकर, राहुल शिवणकर, सोपान भोसले यांच्यासह विविध गावचे सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. मुळीक म्हणाले, ‘‘गिरी दांपत्यावर जनतेचे असलेले प्रेम व विश्वास यावेळी प्रकर्षाने दिसून येत आहे. सत्ता असो वा नसो, त्यांनी कधीही पदाचा गर्व न करता सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून राहून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत दिलासा देण्याचे कार्य सातत्याने केले आहे. त्यामुळेच जनतेचा गिरी कुटुंबावर अढळ विश्वास आहे.’’
विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदार एकजुटीने भाजपच्या जयश्री गिरी यांच्यासह पंचायत समिती गणाचे उमेदवार सौरभ शिंदे व चारुशीला पवार यांना बहुमताने निवडून देतील, असा विश्वास अंकुशराव शिवणकर यांनी व्यक्त केला.

चौकट
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
माजी सभापती जयश्री गिरी, सुहास गिरी तसेच चारुशीला पवार यांनी नुकताच सायगाव गणातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीमध्ये प्रत्यक्ष भेटी देत मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान मतदारांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत भरघोस पाठिंबा जाहीर केला. विकास, विश्वास व लोकसंपर्क या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे जयश्री गिरी यांच्या प्रचाराबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

02348
खर्शी तर्फ कुडाळ : येथे झालेल्या मतदार भेटीप्रसंगी जयश्री गिरी, सुहास गिरी व ग्रामस्थ.
(प्रशांत गुजर ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com