Girish Bapat, Sharad Pawar I मी बापट असलो तरी अंकुश काकडे पोपट; भाजप नेत्याचा पवारांना सल्ला म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

girish bapat

'काकडे यांना काहीही द्या पण भगतसिंग कोश्यारी आहेत तोवर विधानपरिषद देऊ नका'

मी बापट असलो तरी अंकुश काकडे पोपट; भाजप नेत्याचा पवारांना सल्ला

आजकाल राजकारण हा व्यवसाय झाला आहे. राज्यातील सध्याची राजकारणाची स्थिती बिकट आहे. मी बापट असलो तरी राष्ट्रवादीचे अंकुश काकडे पोपट आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना विनंती आहे की, काकडे यांना काहीही द्या पण भगतसिंग कोश्यारी आहेत तोवर विधानपरिषद देऊ नका, असा खोचक टोला गिरीश बापट यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांना लगावला आहे. आज ते पुण्यात बोलत होत.

यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. गिरीश बापट म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव पुलाचं नाव दिलं पण ही संकल्पना दुसऱ्याच्या नावे आहे. संकल्पना म्हणजे काय हे मला समजतच नाही. आजकाल सुशिक्षित लोकं मतदान करत नाहीत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. पुण्यात अनेक प्रश्न गंभीर आहेत. पुण्याचा प्राणी प्रश्न मोठा आहे. पण याची चर्चा सभागृहात होत नाही. प्रसिद्धी आंदोलने न होता संबंधित आंदोलनातून लोकांचा फायदा होईल याचा विचार झाला पाहिजे, असंही बापट यांनी सुचवलं आहे.

पुढे ते म्हणाले, पुण्यातल्या गणेशोत्सवला चांगलं स्वरूप आलं आहे. रक्तदान शिबीरांसारखे समाजोपयोगी कार्यक्रम होत आहेत. आधी वर्गणीची दादागिरी चालत होती. आता तसे होत नाही. रात्रभर भोंग्यांचा त्रास व्हायचा. मात्र त्या भोंग्याचा या भोंग्यशी काही संबंध नाही, असं म्हणत त्यांनी भोंग्याच्या मुद्द्याचं स्पष्टीकरणही दिलं आहे. यावेळी बापट म्हणाले, शरद पवार यांना विनंती आहे की, अंकुश काकडे यांना काहीही द्या, पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आहेत, तोपर्यंत विधानपरिषद देऊ नका असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.