CM Thackeray, Devendra Fadnavis I ठाकरे फडणवीसांना पुन्हा आडवे; CM ठाकरेंच्या ताफ्यामुळे फडणवीस ताटकळत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

ठाकरे फडणवीसांना पुन्हा आडवे; CM ठाकरेंच्या ताफ्यामुळे फडणवीस ताटकळत

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण गढूळ झालं आहे. हनुमान चालीसा पठणीवरून राणा दाम्पत्याला अटक झाली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटकाही करण्यात आली. दरम्यान, या सगळ्यात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपा यांच्यातील नेत्यांत चांगलीच जुंपली. आता एक वेगळी बातमी समोर येत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवलेल्या एक बातमीत मुख्यमंत्री ठाकरे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना पुन्हा आडवे आले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा जात असल्याने देवेंद्र फडणवीस ताटकळत उभे रहावे लागेल आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची कशी हुकली आणि आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यामुळं फडणवीस यांना ताटकळत उभं रहावं लागलं. २०१९ साली शिवसेनेनं भाजपाची साथ सोडली आणि मुख्यमंत्रीपद हुकलं. तसेच लिलावती रुग्णालयातून खासादार नवनीत राणा यांची भेट घेऊन निघत असताना मात्र समोरून उद्धव ठाकरे यांचा ताफा जात असताना देवेंद्र फडणवीस यांना गाडीतच ताटखळत बसावं लागलं. या बातमीचा व्हिडिओ एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवला आहे.

या व्हिडिओमुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद चिघळला असताना आता या बातमीमुळे पुन्हा एकदा कोणता नवा वाद उफाळून येणार का अशा सवाल केला जात आहे.