भाजपचे खासदारच म्हणतात, पालिकेत सत्ता असली तरी त्रृटींवर बोला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

कोेरोनाच्या काळात प्रभावी उपाययोजना करू न शकणाऱ्या राज्यशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर शुक्रवारी "महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.

पुणे : 'कोरोना'वर नियंत्रण आणण्यास महाविकास आघाडी सरकारला अपयश येत अाहे. सरकारने कष्टकरी जनतेसाठी पॅकेज जाहीर करावे अशी मागणी करत  "मेरा आंगण मेरा रणांगण" या संकल्पनेवर शहर भाजपतर्फे शुक्रवारी विविध ठिकाणी 'महाराष्ट्र बचावो' आंदोलन करण्यात आले. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना या आपत्ती विरोधात लढण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करू न शकणाऱ्या राज्यशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर शुक्रवारी (ता.२२) "महाराष्ट्र बचाव आंदोलन" करण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

'कोरोना'मुळे जास्त कार्यकर्ते आल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे अवघड होणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी घराच्या समोर, गॅलरीत, गच्चीवर अंगात काळे कपडे परिधान करून, राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध करणारे फलक घेऊन गर्दी न करता आंदोलन करण्यात आले. 

भाजपच्या शहर कार्यालय शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट यांनी आंदोलन केले. शहराच्या विविध भागात चार-पाच कार्यकर्ते एकत्र येऊन हातामध्ये भाजपचा झेंडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर घेऊन महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. "१२ बलुतेदारांना मदत मिळावी पाहिजे", "कष्टकरी, घरेलू कामगार, सलून व्यावसायिक यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे",  "उद्धवा  अजब तुझे सरकार, जनता झाली बेजार" अशा घोषणा देण्यात आल्या. यामध्ये नगरसेवक, आमदार, कार्यकर्ते, महिला, पदाधिकारी सहभागी झाले होते. 

हेही वाचा- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलंय आनंदनगर

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, "केंद्र सरकारने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले, पण राज्य सरकारने कष्टकरी जनतेला कोणताही दिलासा दिलेला नाही. ससूनमध्ये चार पैकी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू होत आहे. राज्य सरकारचे हे अपयश आहे. नागरिकांना दिलासा मिळावे म्हणून हे आंदोलन केले आहे."

खासदार गिरीश बापट म्हणाले, "आम्ही सरकारला सहकार्य करण्यासाठी तयार आहोतच, पण सरकारने आवश्यक निर्णय घेतले नाहीत म्हणून आंदोलन करावे लागले आहे.  पुणे महापालिकेत सत्ता असली तरी जेथे त्रृटी असतील तेथे बोलले पाहिजे."

सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप 
आंदोलन शांततेत झाले असले तरीआंदोलनाचे फोटो 
सोशल मीडियावरून व्हायरल करून भाजप कार्यकर्त्यांनी 'कोरोना'ना नियंत्रणासाठी असलेल्या ढिसाळ नियोजनावरून सरकारला जाब विचारला. तर महाविकासआघाडी सरकार समर्थकांनी भाजपवर पलटवार केल्याने हे आरोप-प्रत्यारोपाचाचे आखाडे रंगले होते.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girish Bapat criticizes Thackeray government