पुण्यात तरुणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 February 2021

एका तरुणीने रात्री दीडच्या सुमारास पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. महमंद वाडी परिसरातील लेन क्रमांक 10मध्ये 7 पार्क येथे ती राहत होती.

हडपसर : इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून २२ वर्षाच्या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना महमदवाडी येथे उघडकीस आली. आत्महत्याचे कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना रविवारी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास घडली.

आणखी वाचा - ब्रेकफास्ट अपडेट्स एका क्लिकवर

पूजा लहू चव्हाण (वय २२, सध्या रा. लेन नं. १०, हेवनपार्क, मुळगाव परळी वैजनाथ, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाउ विलास चव्हाण व मित्र अरूण राठोड यांच्या सोबत ती भाडयाच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दिड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मनक्याला गंभीर दुखापत झाली.

आणखी वाचा - पाकिस्तानी-खलिस्तानी ट्विटर अकाऊंट बंद करा; सरकारचे आदेश

विलास व अरूण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला. आई-वडिलांचा जबाब घेतला असता त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. मात्र, ती सोरायसीस या आजाराने त्रस्त असल्याने तिने आत्महत्याचे पाउल उचलले असावे. घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आली नाही. प्रेमप्रकरणातून तिने आत्महत्या केल्याचा संशय सकाळी व्यक्त होत होता. मात्र, त्या संपूर्ण चर्चेला पूर्णविराम मिळालाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl commits suicide allegedly affair with minister