लंगडी खेळताना पडल्याने चिमुकलीचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

पिंपरी : शाळेत लंगडी खेळत असताना पडल्याने दुसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथे गुरूवारी (ता. 30) सकाळी घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी : शाळेत लंगडी खेळत असताना पडल्याने दुसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना चिखली येथे गुरूवारी (ता. 30) सकाळी घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अंकिता गजानंद डोणे (वय 8, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. अंकिता ही अभिनव विद्यालयात इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होती. सकाळी अकराच्या सुमारास शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासाला अंकितासह इतर मुले लंगडी खेळत होती. अंकिता लंगडी खेळत असताना अचानक कोसळल्याने बेशुद्ध झाली. तेथील शिक्षकांनी तिला तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl died while playing at school