

Pune Accident
ESakal
पुण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी दुपारी प्रतिष्ठित कोलते पाटील लाईफ रिपब्लिक हाऊसिंग सोसायटीजवळ डंपरने झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला. ज्या तरुणीने आपला जीव गमावला ती तिच्या वडिलांच्या मागे दुचाकीवर बसली होती. मुलीच्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे, असे पोलिसांनी सांगितले. यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.