esakal | पुणे विभागाला पूर्णवेळ उपसंचालक द्या; कुणी केली मागणी?
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena

फार्मसी, पाॅलिटेक्निक, एमबीए, इंजिनियरिंग, आर्किटेक्चर यासह इतर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचा पुण्यातील तंत्र शिक्षण विभागाशी थेट संबंध आहे. 

पुणे विभागाला पूर्णवेळ उपसंचालक द्या; कुणी केली मागणी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे विभागात येणारे पाच जिल्हे, त्यातील तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचा पसारा मोठा असताना या विभागाच्या उपसंचालकांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे विद्यार्थी, संस्थांची गैरसोय होत असल्याने पुणे विभागाला पूर्णवेळ उपसंचालक द्या, अशी मागणी शिवसेनेचे उप शहर प्रमुख किरण साळी यांनी उच्च तंत्रशिक्षणचे संचालक डॉ. अभय वाघ यांच्याकडे केली आहे.

सार्वजनिक गणेश मंडळाच्या दर्शनाबाबत उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पोलिसांना दिले आदेश

पुणे विभागात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. फार्मसी, पाॅलिटेक्निक, एमबीए, इंजिनियरिंग, आर्किटेक्चर यासह इतर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांचा पुण्यातील तंत्र शिक्षण विभागाशी थेट संबंध आहे. 

इतर विभागापेक्षा पुणे विभागातील महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थांचे प्रश्न, अडचणींची संख्याही मोठी आहे. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षण संस्थांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी पुणे विभागाला पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक द्यावा. सध्याच्या शिक्षण उपसंचालकांकडे दोन पदभार आहेत. त्यामुळे त्यांना या पदाला न्याय देता येत नाही. हे डॉ. वाघ यांच्या निर्दशनास आणून दिले. दरम्यान, डॉ. वाघ यांनी पुणे विभागाला लवकरात लवकर पूर्णवेळ शिक्षण उपसंचालक देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे, असे साळी यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top