तुकाराम बीज सोहळ्यासाठी भाविकांना चांगल्या सुविधा द्या - सुनील शेळके

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 March 2020

‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत येतात. त्यांना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे द्याव्यात,’’ असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी सोमवारी (ता. ९) येथे अधिकाऱ्यांना केले.

देहू - ‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक देहूत येतात. त्यांना सोयी सुविधा चांगल्या प्रकारे द्याव्यात,’’ असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी सोमवारी (ता. ९) येथे अधिकाऱ्यांना केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी शेळके बोलत होते.
 हवेलीचे प्रांताधिकारी सचिन बारवकर, पिंपरी-चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, सरपंच पूनम काळोखे, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, पंचायत समितीच्या सदस्या हेमा काळोखे, सदस्य रत्नमाला करंडे, सुनीता टिळेकर, ज्योती टिळेकर, हेमा मोरे, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर, पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

शेळके म्हणाले, ‘‘देहूत येणाऱ्या भाविकांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यांच्या चांगल्या सुविधा द्याव्यात. कामात कोणतीही हयगय करू नका. काय कमी असेल ते सांगा. वाहतुकीच्या समस्या निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.’’

ऑडिट होणार
या आढावा बैठकीत देहूतील अनेक समस्यांचे गाऱ्हाणे ग्रामस्थांनी मांडले. त्यात पाणीपुरवठा योजना, गटारे, शौचालय, रस्ते, वाहनतळ या विषयांचा समावेश होता. तसेच येलवाडी येथे जाण्यासाठी इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम झालेले आहे. मात्र, रस्त्याला पूल जोडण्यात आला नाही. दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक होऊनही संबंधित शेतीमालकाला मोबदला सार्वजनिक बांधकाम खात्यातून देण्यात आला नाही. हा पूल जोडला न गेल्याने देहूतील गर्दीवर परिणाम होतो.

शेळके म्हणाले, ‘‘देहूतील विकासकामे झाल्याचे ऑडिट करा. संबंधित खात्याचा अभियंता, ठेकेदार, वॉर्ड सदस्य, सरपंच आणि ग्रामस्थ, ग्रामविकास अधिकारी यांनी वार्डात फिरून झालेल्या कामांची पाहणी करा. तसा अहवाल तयार करा. काम का झाले नाही, याची खात्री करा. कोणत्याही एका व्यक्तीमुळे नागरिकांना त्रास नको.’’ गायकवाड, बारवकर यांनी मार्गदर्शन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give good facilities to the devotees for the Tukaram bjj Ceremony sunil shelake