esakal | बारामती : अठरा महिन्यांच्या बालिकेला मदतीचा हात द्या; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

अन्वी वाव्हळ

अठरा महिन्यांच्या बालिकेला मदतीचा हात द्या; उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

sakal_logo
By
मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (ता. 2) बारामती दौ-यावर होते. या दौ-यामध्ये पुण्यातील अन्वी सूरज वाव्हळ या अवघ्या अठरा महिन्यांच्या बालिकेचे नातेवाईक पवार यांना भेटण्यासाठी आले होते.

अन्वी हिला दुर्मिळ मानला जाणारा स्पायनल मस्क्युलर एस्ट्रॉफी या आजाराने ग्रासले आहे. त्यावर सोळा कोटी रुपयांच्या झोलगेन्स्मा या इंजेक्शनची गरज आहे. अन्वीचे वडील आयटी कंपनीत इंजिनिअर असले तरी त्यांना इतकी मोठी रक्कम उभी करणे अशक्य आहे. त्यांनी तरीही प्रयत्न करुन आतापर्यंत 75 लाख रुपये जमाही केलेले आहेत.

हेही वाचा: खळबळजनक! शिवसेना नेत्यानेच परबांविरोधातील माहिती सोमय्यांना पुरविली?

अजित पवार यांनी ही कहाणी ऐकल्यानंतर आपले स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांना बोलावून या बाबत माध्यमातून आवाहन करण्याची सूचना दिली. या अठरा महिन्याच्या बालिकेला समाजाच्या सर्व स्तरातून मदतीचा हात देण्याचे आवाहन खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. सोळा कोटी रुपये उभे करण्यासाठी प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करावा जेणे करुन या छोट्या बालिकेला मदत होऊ शकेल, असे अजित पवार म्हणाले. दानशूर व्यक्ती, संस्था तसेच सीएसआरच्या माध्यमातून अन्वीला मदत करण्यासाठी पुढे यावे असे पवार यांनी नमूद केले.

मदतीसाठी खालील बँक खात्यावर पैसे जमा करावते, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • अन्वी सूरज वाव्हळ

  • वडीलांचा फोन नंबर- 9766188989

  • बँक खाते क्रमांक- 50100440238877-

  • बँक- एचडीएफसी,

  • शाखा- चिंचवड.

  • आयएफसी कोड- HDFC0001795

loading image
go to top