
पुण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगार शाहरूख उर्फ अट्टी रहीम शेख याचा पुणे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. पुणे पोलीस त्याला अटक करण्यासाठी गेले असताना शाहरूखने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरूख गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारावेळी मृत्यू झाला.