रुग्णांना रेमडेसिव्हिर मोफत द्या; आरोग्य मंत्र्यांची सूचना

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेल्या "सीओईपी'च्या आवारातील जम्बो कोविड केअर सेंटर आणि बाणेरमधील कोविड रुग्णालयाला टोपे यांनी भेट दिली. महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना टोपे यांनी काही सूचना केल्या.

पुणे - पुण्यातील "जम्बो' आणि कोविड रुग्णालयामधील बेडची संख्या वाढविण्यासह अत्यवस्थ रुग्णांना मोफत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आणि सिटी स्कॅनची सुविधा पुरविण्याची सूचना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला केली. तसेच रुग्णांच्या नाश्‍ता व जेवणाला प्राधान्य देण्याचा सल्लाही दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेल्या "सीओईपी'च्या आवारातील जम्बो कोविड केअर सेंटर आणि बाणेरमधील कोविड रुग्णालयाला टोपे यांनी भेट दिली. महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना टोपे यांनी काही सूचना केल्या. याप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, "जम्बो'चे समन्वयक राजेंद्र मुठे, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील उपस्थित होत्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

400 खाटा वाढविण्याची सूचना 
शिवाजीनगर येथील "जम्बो'त आणखी 400 खाटा तातडीने वाढविण्याची सूचना टोपे यांनी केली. येथील उपचार सर्व घटकांच्या सोयीचे असल्याने मागणीच्या प्रमाणात पुरेशा खाटा उपलब्ध करण्याची गरज असल्याकडे टोपे यांनी लक्ष वेधले. आठवडाभरात सर्व सेवा-सुविधा उभारा, ज्यामुळे गरीब रुग्णांना फायदा होणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संवाद यंत्रणा सक्षम करा 
कोरोना झालेल्या, मात्र अन्य आजार असलेल्या रुग्णांना वेळेत अन योग्य उपचार देवून त्यांना कोरोनामुक्त करण्यावर भर द्या, असेही राजेश टोपे यांनी "जम्बो'च्या व्यवस्थापनाला सांगितले. अशा रुग्णांवरील उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्‍टर नेमण्यापासून त्यांच्यासाठी मोफत औषधांची सोय करता येईल. ज्यामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. ज्या रुग्णांना खाटांची गरज आहेत, त्यांना सहजरीत्या ती उपलब्ध झाली पाहिजे. रुग्ण आणि उपचार व्यवस्थेतील संवाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याची सूचनाही टोपे यांनी केली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give patients remdesivir injection free says Health ministers