esakal | 'आधी भारतीयांना लस द्या; मग त्या पाकिस्तान्यांना द्या'; 'सिरम'समोर काँग्रेसचं आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine for India First

'भारतीय सैनिकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला मोफत लस पुरवण्याऐवजी भारतातील सरसकट सर्व वयोगटातील जनतेला मोफत कोरोना लस द्या.'

'आधी भारतीयांना लस द्या; मग त्या पाकिस्तान्यांना द्या'; 'सिरम'समोर काँग्रेसचं आंदोलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मांजरी : भारतीय सैनिकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानला मोफत लस पुरवण्याऐवजी भारतातील सरसकट सर्व वयोगटातील जनतेला मोफत कोरोना लस द्या, अशी मागणी करत हडपसर मतदारसंघातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील सिरम कंपनीसमोर आंदोलन केले. मतदार संघाचे अध्यक्ष अमित घुले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.  पाकिस्तानला मोफत कोरोना लस देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन केले.   गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक येथील सिरम इन्स्टिट्यूट कंपनीच्या प्रवेशद्वारावर निषेधाचे फलक झळकावून व घोषणा देत कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. आंदोलन करण्यात आले यावेळी अमित घुले हे बोलत होते.

- राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
     
युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल शिरसाठ, प्रसाद वाघमारे, स्वप्नील डांगमाळी, अक्षय जगताप, संदीप ढेरे, स्वप्नील नाईक, सुजित गोसावी,क्षराजू ठोंबरे, अक्षय चौधरी, सुरेश डोळस, राकेश भिलारे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. "हडपसर मतदारसंघात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यासाठी ग्लायडिंग सेंटर सारख्या मैदानावर तातडीने जम्बो कोव्हिडं रुग्णालय सुरू करण्यात यावे, शासनाने शत्रूराष्ट्र असलेल्या  पाकिस्तानला मोफत कोट्यवधी कोरोना लसीचे डोस देण्याऐवजी सर्व वयोगटातील भारतीय नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून द्यावी,' अशी मागणी  मतदार संघाचे अध्यक्ष अमित घुले यांनी यावेळी केली.
 

loading image