ओतूर - ओतूर (ता. जुन्नर) येथील सहावर्षीय चिमुकल्याला नाताळाच्या दिवशी (ता. २५) दुपारी अतिविषारी नागाने दंश केला. मात्र, योग्य सल्ला व तत्पर उपचार मिळाल्यामुळे १२ तास बेशुद्ध राहूनही त्याला जीवदान मिळाले आहे. देव तारी त्याला कोण मारी..ओतूर येथील अनिरुद्ध मुकेश विश्वकर्मा याला बुधवारी (ता. २५) खेळत असताना नागाने दंश केला. जवळच काम करत असलेल्या वडिलांनी ते पाहिले आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्वरित अनिरुद्धला ओतूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुशील बागूल यांच्याकडे नेले. तेथे जाईपर्यंत अनिरुद्धला तीव्र वेदना व उलट्या होत होत्या..परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. बागूल यांनी डॉ. सदानंद राऊत यांना रुग्णाच्या लक्षणांची कल्पना दिली. त्यांच्या सल्ल्याने अनिरुद्धला प्रथम ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. श्रीहरी सरोक्ते यांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने नारायणगाव येथे पाठविले..यावेळी चालक गणेश गायकर यांनी अवघ्या १६ मिनिटांत रुग्णवाहिका नारायणगाव येथे पोहोचवली. सर्पदंश झाल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांत रुग्ण विघ्नहर नर्सिंग होम येथे पोहोचला. तरीसुद्धा रुग्णाचे हृदय व श्वास बंद पडलेला होता. येथील डॉ. पल्लवी राऊत, डॉ. सदानंद राऊत व डॉ. साहिल शेख यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला छातीवर मसाज देत श्वसनलिकेत नळी टाकून कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू केला..त्याबरोबरच इतर तातडीचे वैद्यकीय उपचार इंजेक्शन अॅट्रोपिन, निओस्टिग्माइन, अॅड्रीनालीन व इतर जीवनावश्यक औषध देण्यात आली. त्याबरोबरच सर्पदंशावरील लसीचे २० वायल्स काही मिनिटांत देण्यात आले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर अनिरुद्धचे हृदय उपचाराला प्रतिसाद देऊ लागले. रक्तदाब वाढू लागला.१२ तासांपेक्षा अधिक काळ बाळ पूर्णपणे बेशुद्ध होते. ते हळूहळू शुद्धीवर आले. त्यानंतर २४ तासानंतर बाळाला पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला व नाडीची गती वाढू लागली. पुन्हा विषाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्याला परत सर्पदंशाची लस देण्यात आली..दोन दिवसानंतर तो पूर्णपणे शुद्धीवर आला असून, त्याच्या जिवाचा धोका टळला आहे. दंशाच्या ठिकाणी खूप सूज आली असून, गँगरीन झाले आहे. त्याचा पाय वाचविण्यासाठी शस्रक्रिया करणार आहे. आमदार शरद सोनावणे यांनी हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णाची चौकशी करून डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत व त्यांचे सर्व टीमचे अभिनंदन केले..प्रशिक्षण ठरले महत्त्वाचेडॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत करत असलेल्या जनजागृती व डॉक्टरांचे प्रशिक्षणामुळे रुग्ण हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहचला व त्याचे प्राण वाचण्यासाठी मदत झाली. ‘मिशन झिरो स्नेकबाइट डेथ’ (शून्य सर्पदंश मृत्युदर प्रकल्प) या उपक्रमांतर्गत खासगी डॉक्टर, शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णवाहिका चालकांना मिळालेले प्रशिक्षण या गंभीर परिस्थितीत अमूल्य ठरले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.