Pune Crime : भोंदूबाबा मिश्रासह महिला आरोपींचा असहकार; तपास अधिकाऱ्याची न्यायालयात माहिती

ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत एका उच्चशिक्षित महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणात छळ व इतर गंभीर आरोपांखाली दाखल गुन्ह्यात आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमधील पुरावे मिळवायचे आहेत.
Crime

Crime

sakal

Updated on

पुणे - ईश्वराचा अवतार असल्याचे सांगत एका उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणात छळ व इतर गंभीर आरोपांखाली दाखल गुन्ह्यात आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमधील पुरावे मिळवायचे आहेत, मात्र लॅपटॉपच्या पासवर्डची मागणी केली असता आरोपींनी तो दिला नाही. आरोपी हे जाणूनबुजून तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती तपास अधिकारी यांनी न्यायालयात दिली. या गुन्ह्याचे धागेदोरे हे हरियाणापर्यंत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com