चिंचवड स्टेशन येथील गोदामाला आग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

चिंचवड स्टेशन येथील खासगी कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. १४) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली.

पिंपरी - चिंचवड स्टेशन येथील खासगी कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. १४) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. दूर अंतरापर्यंत धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोहननगर येथील एमआयडीसी कार्यालयासमोर डिसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तीन महिन्यांपासून बंद आहे. कंपनीतील स्टेअर पार्टच्या गोदामाला अचानक आग लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलासह टाटा मोटर्स व महिंद्रा कंपनीच्या एकूण आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, परिसरातील वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळापर्यंत पोचताना कसरत करावी लागली. 
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती उपअग्निशमन अधिकारी अशोक कानडे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Godown fire at Chinchwad Station