

Sharp Decline in Gold and Silver Prices Brings Relief to Buyers in Pune
Sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून तुलनेने स्थिर असलेल्या सोन्याच्या भावात सोमवारी मोठी घसरण झाली. २७ सप्टेंबरच्या तुलनेत २८ सप्टेंबरला २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३ हजार ३० रुपयांनी कमी झाला. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ५२ हजार १०६ रुपयांवरून १ लाख ४९ हजार ७६ रुपयांवर आला. २२ कॅरेट सोन्याच्या भावातही २ हजार ७९० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे.