राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बुध्दभुषन गायकवाड याला सुवर्णपदक

मिलिंद संधान.
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नवी सांगवी ( पुणे ) : आँल इंडिया इंडिपेन्डन्स कप या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत काळेवाडी येथील बुध्दभुषन गायकवाड याने वरिष्ठ गटात सुवर्ण पदकाची कमाई केली असुन संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरातुन त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दहा आँगस्ट ते बारा आँगस्ट दरम्यान नवी दिल्ली येथील ताराकोटला इनडोअर स्टेडीयम मध्ये पार पडलेल्या या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत सेईको काई कराटे इंटरनँशनल या संघाकडून खेळताना गायकवाड याने आसाम राईफल पँरामिलेटरी फोर्सच्या पवन चौहान याचा पराभव केला.  

या स्पर्धेत भारतातील विविध राज्ये, सेनादल व इतर पँरामिलिटरी फोर्समधिल तीन हजार पेक्षा अधिक खेळाडुंनी आपला सहभाग नोंदविला होता. बुध्दभुषन हा सेनसाई अविनाश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली मागिल दहा वर्षापासून सराव करीत आहे. तसेच तो पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या कला शाखेत तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. 

Web Title: Gold medal for Budhbhushan Gaikwad in the National Karate Championship