लोणंद - महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले.

लोणंद - महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले.
Published on

काळजमध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
लोणंद, ता. १० : वॉकिंग करून घरी परतताना पाठीमागून बिना नंबरच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे तीन ग्रॅम वजनाचे ९२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून चोरून नेले. काळज (ता. फलटण) येथील दत्त गार्डन मंगल कार्यालयानजीक रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत माहिती अशी, की काळज येथील दत्तगार्डन मंगल कार्यालयाशेजारी राहाणाऱ्या कांता सुरेश फाळके या काल सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास दत्त गार्डन मंगल कार्यलयाच्या आवारात वॉकिंग करून घरी परतत असताना पाठीमागून बिन नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे तीन ग्रॅम वजनाचे, दोन्ही बाजूस आठ- आठ काळे मनी व दोन सोन्याच्या वाट्या असलेले सुमारे ९२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून चोरून फलटणच्या दिशेने पळून गेले. याबाबत कांता सुरेश फाळके (वय ५५, रा. काळज, दत्त गार्डन मंगल कार्यालय शेजारी, ता. फलटण, जि. सातारा) यांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद नोंदवली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी भेट दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. हेगडे हे अधिक तपास करत आहेत.

---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com