

"Gold Soars Past ₹1.11 Lakh in Pune – Festival Season Pinches Wallets"
Sakal
सनील गाडेकर
पुणे : सोन्याच्या भाववाढीची घोडदौड पुन्हा सुरू झाली असून, २४ कॅरेट प्रति दहा ग्रॅम सोने एक लाख ११ हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. केवळ एका महिन्यात सोने जवळपास १० हजार रुपयांनी महागले आहे. त्यामुळे ऐन सणांच्या तोंडावर ग्राहकांना सोन्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.