

Tribute to a Visionary: Dr. Vasant Gowarikar’s Role in India’s Space Success Highlighted
sakal
पुणे : भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचणाऱ्या दिग्गजांच्या आठवणींना जेव्हा उजाळा मिळतो, तेव्हा तो इतिहास नव्याने जिवंत होतो. भारतीय अंतराळ झेपेत मोलाचा वाटा उचलणारे द्रष्टे वैज्ञानिक डॉ. वसंत गोवारीकर यांच्यासमवेत असणाऱ्या मैत्रीचे ऋणानुबंध ज्येष्ठ अंतराळशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद काळे यांनी उलगडले. निमित्त होते, डॉ. वसंत गोवारीकर स्मृती व्याख्यानाचे.