चिंचोली मोराचीमध्ये कृषी पर्यटनाला सुगीचे दिवस; हुर्डा पार्ट्यांचा आखतायेत बेत

युनूस तांबोळी
Thursday, 31 December 2020

शिरूर तालुक्यात चिंचोली मोराची हे कृषी पर्यटन म्हणून ओळखले जाते. येथे मोर पाहण्यासाठी एक दिवसाची सहल म्हणून कुटूंबासह येतात. यासाठी घराजवळ, शेतात येथील शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन सुरू केले आहे. सायंकाळी या पर्यटनाजवळ येणारे मोर येथील खास आकर्षण ठरत आहे. यासाठी येथील शेतकऱ्यांनी कॅाटेजची सुविधा केल्या मुक्कामाची देखील सोय होत आहे.

टाकळी हाजी : कोरोनामुळे मंदावलेला शिरूर तालुक्यातील कृषी पर्यटन व्यवसाय सध्या नाताळ व नववर्षाच्या स्वागता निमित्त बहरला असून पर्यटकांनी चिंचोली मोराची हा परीसर फुलला आहे. शेताच्या बांधावर हुर्डा पार्टीचे आयोजन होत असल्याने पर्यटक आनंद घेत आहेत. 

शिरूर तालुक्यात चिंचोली मोराची हे कृषी पर्यटन म्हणून ओळखले जाते. येथे मोर पाहण्यासाठी एक दिवसाची सहल म्हणून कुटूंबासह येतात. यासाठी घराजवळ, शेतात येथील शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन सुरू केले आहे. सायंकाळी या पर्यटनाजवळ येणारे मोर येथील खास आकर्षण ठरत आहे. यासाठी येथील शेतकऱ्यांनी कॅाटेजची सुविधा केल्या मुक्कामाची देखील सोय होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनामुळे येथील व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे एप्रिल व मेच्या कालावधीतला पर्यटनाचा हंगाम कृषी पर्यटन व्यवसायिकांच्या हातातून गेला होता. त्याचप्रमाणे गणपती व दिवाळीच्या सणात देखील पर्यटनाकडे कोणीही फिरकले नाही. मात्र नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे, अहमदनगर, सातारा, मुंबई यासह राज्यातील पर्यटक या भागात येऊ लागल्याने कृषी पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. 

वेगवेगळे मनोरंजन, खेळ यामुळे येथील कृषी पर्यटन प्रसिद्ध आहे. शिवार फेरी मध्ये बैलगाडी, घोडा गाडी व इतर फेरी सुद्धा पर्यटकांना घडविल्या जात आहे. सामाजीक अंतर व कोरोनाचे नियम पाळून श्री मेसाईदेवी, श्री येमाई देवी, श्री मळगंगा देवी, रांजणगावचा महागणपती यांचे दर्शन व जगप्रसिद्ध रांजणखळगे पहाण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत.  

जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर  

हुर्डा पार्टीचे नियोजन...
कुडकुडणारी थंडी आणी खेळाचा आनंद घेण्यासाठी बहुतेक पर्यटक या निसर्ग परीसरात येत असतात. निसर्गाच्या सानिध्यात राहून येथील गावरान खाद्यावर मनमुराद पर्यटक आनंद घेतात. सध्या या परीसरात ज्वारीचे पिक डोलू लागल्याने हुर्डा पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये वेगवेगळ्या चटण्या, शिजवलेले मका कणीस, गुळ, हुर्डा, बोर यांचा आस्वाद पर्यटक घेताना दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good days for agri-tourism in Chincholi Morachi demand increased in for hurda party