जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 December 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या आपल्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमामध्ये काश्मीरच्या केसरचा उल्लेख केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीच्या आपल्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमामध्ये काश्मीरच्या केसरचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की, काश्मीरी केसरला GI Tag चे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर दुबईच्या एका सुपर मार्केटने त्याला लाँच केलं आहे.

हेही वाचा - हृदय रुग्णांनो, थंडीत आरोग्य सांभाळा! रक्तप्रवाहात अडथळ्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

भारतामध्ये जम्मू-काश्मीर शिवाय हिमाचल प्रदेशामध्ये केसरची शेती केली जाते. केसरमध्ये खनिज आणि कार्बनिक संयुगे असतात. यामुळे शरिरातील कॅल्शियमची कमतरता कमी होते. तसेच हाडे देखील मजबूत होतात. 

  • केसरमुळे दातांचे दुखणे सुद्धा नष्ट होते. याशिवाय केसर निद्रानाशाच्या आजारावर देखील परिणामकारक आहे. केसरमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅरोटीनॉइड असतं. यामुळे ब्लड कँसर आणि ब्रेस्ट कँसरपासून वाचण्यास मदत होते. 
  • महिलांच्या गर्भारपणाच्या काळात गॅस आणि सूज यांसारख्या समस्या येतात. केसरचे दूध या साऱ्या समस्यांवर परिणामकारक ठरू शकतं. याशिवाय डिप्रेशन सारख्या समस्यांवर देखील केसर प्रभावी ठरतं. 
  • सेक्स लाईफसाठी देखील केसर खूपच फायदेशीर ठरतं. दुधात मनुके, बदाम आणि केसर घालून पिल्याने पुरुषांमधील कमजोरी दूर होते. याशिवाय स्पर्मची संख्या देखील वाढते. 
  • केसरचे सेवन करण्याआधी काही खास गोष्टी ध्यानात ठेवणे जरुरी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की, आपण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात केसरचे सेवन बिलकुल करु नका. यामुळे डोकेदुखी, उलटी आणि भुकेवर परिणाम होणे यासारखे साईड इफेक्ट होऊ शकतात. 
  • हृदयरोगाच्या रुग्णांना केसरचे सेवन टाळले पाहिजे. याशिवाय गर्भवती महिलांनी तसेच बायपोलर डिसऑर्डरच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know benefits of kashmiri kesar in marathi