Summer Holiday : बच्चे कंपनीसाठी खुषखबर ! उन्हाळी सुट्ट्यांमुळे उद्यानांच्या वेळेत वाढ

दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेकडून उद्यानांच्या वेळेत वाढ
Good news for children Increase park time due to summer vacations Municipal Corporation pune
Good news for children Increase park time due to summer vacations Municipal Corporation pune

पुणे : परिक्षा झाली, शाळेला सुट्टी लागली आणि घरात, सोसायटीत खेळूनही तुम्हाला आता कंटाळा आला असेल. तर आता काळजी करण्याचे कारण नाही. शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्यामुळे बच्चे कंपनीचा दिवस आणखी आनंदात, खेळण्यात जावा, यादृष्टीने शहरातील सर्व उद्यानांच्या वेळांमध्ये काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा मुलांना अर्धा तास आणखी उद्यानांमध्ये खेळण्याची संधी महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे.

शहरातील बहुतांश शाळांच्या परिक्षा संपुन आता मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. आत्तापर्यंत मुलांचा बहुतांश वेळ परिक्षांचा अभ्यास करण्यात जात होता. सुट्ट्या लागल्यानंतर मुलांना खेळण्याचे वेध लागले आहेत.

आतातापर्यंत घरात, सोसायट्यांच्या उद्यानांमध्ये मुलांना खेळण्यासाठी जाता येत होते. मात्र सकाळी व सायंकाळी देखील मुलांना शहरातील उद्यानांमध्ये खेळण्याचा अधिकाधिक आनंद घेता यावा, यादृष्टीने महापालिकेच्या उद्यान विभागाकडून उद्यानांच्या वेळांमध्ये वाढ करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासूनच वेळेमध्ये वाढ केली आहे.

शहरातील महापालिकेच्या उद्यानांची वेळ सकाळी सहा ते साडे दहा आणि दुपारी चार ते रात्री आठ या नियमीत वेळा आहेत. परंतु उन्हाळी सुट्टीमुळे उद्यानांच्या वेळेमध्ये अर्ध्या तासाची वाढ करण्यात आली आहे.

नेहमीपेक्षा अर्धा तास उद्यान खुले राहणार आहे. त्यामुळे सकाळी सहा ते अकरा आणि दुपारी 4 ते रात्री साडे आठ अशी वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. वाढलेल्या वेळेमुळे मुलांना अर्धा तास आणखी मैदानांमध्ये खेळण्याचा आनंद घेता येणार असल्याचे उद्यान विभागांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com