Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

Pune special trains converted into regular trains: पुणे, खडकी व हडपसर येथून धावणाऱ्या तीन विशेष गाड्यांना नियमित दर्जा; तिकीट दर थेट निम्मे होणार, प्रवाशांचा प्रवासखर्च मोठ्या प्रमाणात कमी
Pune Railway Update: Special Train Status Removed, Travel to Get Cheaper

Pune Railway Update: Special Train Status Removed, Travel to Get Cheaper

sakal

Updated on

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या तीन ‘विशेष रेल्वे’ गाड्यांबाबत रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचा विशेष दर्जा काढून आता त्या नियमित केल्या जाणार आहेत. गाड्या नियमित होणार असल्याने त्यांच्या तिकीट दरात मोठी कपात होणार असून, विशेष गाड्यांच्या तुलनेत हा प्रवास थेट अर्ध्या किमतीत म्हणजेच निम्म्या दरात करता येणार आहे. याचा थेट आर्थिक फायदा प्रवाशांना होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com