पर्यटक पुणेकरांसाठी खूशखबर; पुणे-सिंगापूर विमानसेवा लवकरच होणार सुरु

कोणती कंपनी सुरु करणार सेवा, कधी, आठवड्यातून किती फेऱ्या होणार जाणून घ्या
Pune-Singapore
Pune-Singapore
Updated on

पुणे : परदेश प्रवासाची आवड असलेले पुणेकर प्रवासी तसेच पर्यटकांसाठी खूशखबर आहे. कारण पुणे-सिंगापूर विमानसेवा येत्या २ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या विमानसेवेचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे प्राप्त झाला होता. (Good news for Punekar tourists Pune Singapore flight will start soon)

Pune-Singapore
Kerala: केरळात पुन्हा नरबळीचा प्रकार! चिमुकल्यावर जादूटोणा करत हत्येचा प्रयत्न

एअर विस्तारा या विमान कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात आली असून आठवड्यातून ४ वेळा ही विशेष सेवा सुरू राहील. पुणे-सिंगापूर तसेच सिंगापूर-पुणे विमान सेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी सुरू असेल.

Pune-Singapore
Global News: पर्यावरण बदलामुळं नुकसान झालेल्या गरीब देशांना भरपाई? UNकडे मागणी

पुणे-सिंगापूर विमानसेवेचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे प्राप्त झाला होता. त्यानुसार पुणे ते सिंगापूर विमानसेवा लवकरच सुरु करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com