कल्याणीनगर, खराडी, चंदननगर परिसरात लाॅकडाउनला मिळाला 'असा' प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 July 2020

कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला. या लॉकडाउनला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

रामवाडी (पुणे) : कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला. या लॉकडाउनला  नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कल्याणीनगर, खराडी, चंदननगर, वडगावशेरी या भागात दूध डेअरी व औषध दुकाना व्यक्तिरिक्त सर्व दुकाने बंद होती. सफाई कर्मचारी सकाळच्या सुमारास रस्त्यावर त्यांचे काम करताना दिसत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यां कडून चोखपणे त्यांचे कर्तव्य पार पाडत होते. रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. नगररोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पाच ही प्रभागात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानें नागरिक भयभीत झाले आहे. आजच्या या लॉकडाउनला नागरिकांकडून  चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

मी खराडी येथे राहतो. त्या ठिकाणी कोरोना रुग्ण अधिक सापडले आहेत. वस्तीतील लोकांमध्ये धास्ती निर्माण झाली असल्याने प्रत्येकजण सोशल डिस्टन्स पालन करतात. तसेच मास्क रुमाल याचा वापर करत आहेत. त्यामुळे नक्कीच रुग्ण संख्या कमी होण्यास मदत होईल असे मला  वाटते. लॉकडाउनचे पालन सर्वांनी केले पाहिजे.

-अजय डोके, स्थानिक रहिवाशी.

आज या भागात लॉकडाउनला  नागरिकांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे.

-शंकर खटके , वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good response to lockdown in Kalyaninagar, Kharadi, Chandannagar, Wadgaon Sheri area