येरवड्यातील कैद्यांनी सुरु केली इस्त्री सेवा अन्...

Response to prisoners ironing service in pune
Response to prisoners ironing service in pune
Updated on

येरवडा - येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी सुरू केलेल्या इस्त्री विभागाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या विभागात महिन्याला सरासरी सोळा हजार कपडे इस्त्रीसाठी येत असल्याची माहिती कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘कारागृहाच्या उद्योग विभागातर्फे कर्मचारी वसाहतीच्या परिसरात गेल्या महिन्यात इस्त्री विभाग सुरू केला आहे. कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन उपक्रमांतर्गत कैद्यांना विविध उद्योगांत गुंतविले जाते आहे. त्याचाच भाग म्हणून कारागृहाच्या विक्री केंद्राजवळ दोन वर्षांपूर्वी इस्त्री विभाग सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून गेल्या महिन्यात जेल रोड पोलिस चौकीशेजारी आणखी एक इस्त्री विभाग सुरू केला. या ठिकाणी महिन्याला सुमारे सहा हजार कपडे येत आहेत. माफक दर आणि चांगल्या सेवेचा नागरिकांना लाभ होत आहे. त्यामुळे या सेवेचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. 

जेल रोड पोलिस चौकीशेजारी असलेल्या इस्त्री विभागात येरवडा कारागृह कर्मचारी वसाहत, कारागृह मुद्रणालय कर्मचारी वसाहतीसह नागपूर चाळ, हवाईदलातील कर्मचाऱ्यांपासून ते विश्रांतवाडी, टिंगरेनगर परिसरातील नागरिक इस्त्री विभागाच्या सेवेचा लाभ घेत असल्याचे येथील कर्मचारी दिगंबर मल्लाव यांनी सांगितले. कारागृह विक्री केंद्राच्या इस्त्री विभागात महिन्याला सरासरी दहा हजार कपडे येत असून, त्यातून पन्नास हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याची माहिती राजेंद्र धनगर यांनी दिली.

कैद्यांना दिवसाला ६१ रुपये पगार 
कैद्यांची सुधारणा व पुनर्वसनअंतर्गत कैद्यांना विविध उद्योगांत गुंतविले जाते. इस्त्री विभागात सध्या आठ ते दहा जण काम करीत आहेत. ती क्षमता काही दिवसांत बारा कैद्यांपर्यंत जाऊ शकते. इस्त्री विभागात शर्ट किंवा पॅंटसाठी प्रतिनग पाच रुपये, तर साडीला पंधरा रुपये दर आकारला जात आहे. कैद्यांना कारागृहाच्या नियमाप्रमाणे ६१ रुपये प्रतिदिन पगार दिला जात असल्याची माहिती कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली. 

येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या इस्त्री विभागाला वाढता प्रतिसाद पाहून लवकरच अत्याधुनिक लाँड्री केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे नगर रस्ता परिसरातील पंचतारांकित हॉटेलमधील कपडे धुण्यासाठीदेखील ही सेवा पुरविली जाईल. 
- योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्‍चिम महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koregaon Park Water Supply
Sinhagad Road Traffic
The Maharashtra Social Welfare Department says technical issues, if any, will be resolved and no eligible student will be denied the scholarship.
The protesters also expressed support for the ongoing Jantar Mantar agitation and condemned the alleged police action against students in Delhi.
Marathi News Esakal
www.esakal.com