Vidhan Sabha 2019 : सत्ता असतानाही बारामतीचा विकास झाला नाही; पडळकरांचे अजित पवारांवर टीकास्त्र

मिलिंद संगई
Thursday, 3 October 2019

राज्याची सत्ता असतानाही बारामतीचा परिपूर्ण विकास होऊ शकला नाही, इथला माणूस भयमुक्त असला पाहिजे, बारामतीतील मतदारांना त्यांच्या मताची किंमतच आजपर्यंत कळू दिली नाही. 

बारामती शहर : विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांच्यासमोर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर यांचे आव्हान असणार आहे. नेहमीप्रमाणे एकीकडे राष्ट्रवादी विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक लढविणार असून, या भागाचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन पडळकर यांच्या माध्यमातून केले जाणार आहे.

बारामतीत पत्रकारांशी बोलताना पडळकर म्हणाले, राज्याची सत्ता असतानाही बारामतीचा परिपूर्ण विकास होऊ शकला नाही, इथला माणूस भयमुक्त असला पाहिजे, बारामतीतील मतदारांना त्यांच्या मताची किंमतच आजपर्यंत कळू दिली नाही. बारामतीत पुढाऱयांनी पुढाऱ्यांसाठी पुढाऱ्यांच्या कार्यकर्त्यामार्फत चालवलेली लोकशाही मोडीत काढण्यासाठी मी निवडणूक लढवित आहे. 

डावीकडून उजवीकडे झुकलेल्या नागनाथ अण्णांच्या वारसदारांमध्ये फूट ?

धनगर आरक्षणाचे सत्तर टक्के काम भाजपने पूर्ण केले आहे, उर्वरित तीस टक्के काम पूर्ण व्हावे यासाठी राज्यातील कार्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे पडळकर यांनी यावेळी सांगितले. जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे, त्यामागे राजकारण आहे. राज्यातील चळवळीतील लोकांचा माझ्यावर ठाम विश्वास असल्याचेही ते म्हणाले. यावेळी चंद्रराव तावरे, अविनाश मोटे, रंजन तावरे, प्रशांत नाना सातव, सुरेंद्र जेवरे, अँड. नितीन भामे, पांडुरंग कचरे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

"Vidhan Sabha 2019 : अमित, धीरज देशमुख यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gopichand padalkar criticizes NCP Leader Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha 2019